पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

...डा की ण...

               ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, यात माझा कोणाही समाजाला व व्यक्तीच्या मनाला दुखवण्याचा हेतू नाही... मी लहानपणी सर्वात जास्त ऐकलेला शब्द म्हणजे भूत, आत्मा आणि डाकीण. भूत, आत्मा आणि डाकीण कसे असतात; कोण आहे ते, काय करतात ते, हे मला अजून विपरीत आहे, माझ्या समजण्यापलीकडे आहे. मला असं वाटतं की ह्या गोष्टी म्हणजे एका माणसाने एका दुसऱ्या माणसाविषयी आपल्या मनात पाळलेले भय होय. त्यावेळी असे मानले जात होते की, डाकीण ही फक्त एक स्त्रीलिंगी व्यक्ती असते आणि भगत हा पुल्लिंगी व्यक्ती असतो, पण स्त्रीलिंगी व्यक्ती ही भगत सुध्दा असू शकते. आणि असेही मानले जाते की डाकीण मायावी असते, ती माणसांना खाते व काळी जादू करते, काळी जादू करून ती चांगल्या भल्या माणसाचे जीवन उध्वस्त करते तर भगत हा त्या डाकीण पासून लोकांना वाचवत असतो आणि लोकांना जोडीबुटीने व मंत्राने बरे करत असतो. हे झालं चला वळूयात विषयाकडे...                गण्या आपल्या मित्रांसोबत अंधार होऊन गेले तोपर्यंत क्रिकेट खेळत होता. खेळून झाल्यावर तो तिथेच त्याच...