...डा की ण...

               ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, यात माझा कोणाही समाजाला व व्यक्तीच्या मनाला दुखवण्याचा हेतू नाही...

मी लहानपणी सर्वात जास्त ऐकलेला शब्द म्हणजे भूत, आत्मा आणि डाकीण. भूत, आत्मा आणि डाकीण कसे असतात; कोण आहे ते, काय करतात ते, हे मला अजून विपरीत आहे, माझ्या समजण्यापलीकडे आहे. मला असं वाटतं की ह्या गोष्टी म्हणजे एका माणसाने एका दुसऱ्या माणसाविषयी आपल्या मनात पाळलेले भय होय. त्यावेळी असे मानले जात होते की, डाकीण ही फक्त एक स्त्रीलिंगी व्यक्ती असते आणि भगत हा पुल्लिंगी व्यक्ती असतो, पण स्त्रीलिंगी व्यक्ती ही भगत सुध्दा असू शकते. आणि असेही मानले जाते की डाकीण मायावी असते, ती माणसांना खाते व काळी जादू करते, काळी जादू करून ती चांगल्या भल्या माणसाचे जीवन उध्वस्त करते तर भगत हा त्या डाकीण पासून लोकांना वाचवत असतो आणि लोकांना जोडीबुटीने व मंत्राने बरे करत असतो. हे झालं चला वळूयात विषयाकडे...

               गण्या आपल्या मित्रांसोबत अंधार होऊन गेले तोपर्यंत क्रिकेट खेळत होता. खेळून झाल्यावर तो तिथेच त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारण्यात मग्न होता. जवळच क्रिकेटच्या मैदानाहुन एक किलोमीटर अंतरावर नदी होती. तेवढयात नदीच्या दिशेने पडत येणारा नूरप्या अचानक जोरात आदळला की गण्या बऱ्याच दूर-वर फेकला गेला. तिकडे क्रिकेट खेळून झाल्यावर गण्या सोबत गप्पा मारत असणारे सगळे दोघांच्या एकमेंना एवढ्या जोरात आदळणारे दृश्य पाहून घाबरले व त्यांच्या जवळ जाऊ लागले. त्यांना पोहचता-पोहचता नूरप्या पटकन उठला आणि सुरकन पडू लागला, पडता-पडता नूरप्या बोलत होता येतेय ती तो येतेय. माझी बहीण खाल्ली त्याने. काहीतरी होते ते पाहून नूरप्या असं भयाण पडत सुटला होता, आणि हा असे का बोलला माझी बहीण खाल्ली असं. सगळे जण फार घाबरले व आज हे असं झालेलं पाहून आपापल्या घरी निघून गेले...

               नूरप्या कोण होता, आणि त्या नदीत काय करत होता. नूरप्या हा त्या नदीकाठी आपल्या बहिणी सोबत मासे व खेकडे पकडायला गेला होता.

एका वर्षांपूर्वी:-

               बंधारे गावात एक कुटुंब सुखाने राहत होते. आणि जे आहे त्यातच समाधान होऊन राहत होते. हसत खेळत राहणारे हे छोटेसे परिवार. त्या कुटुंबात नूरप्या त्याचे आईवडील व एक बहीण निमू आणि एक मोठा भाऊ नारू होता. नूरप्या चे आईवडील आणि मोठा भाऊ हे शेतात मोलमजुरी करत असे व नूरप्या आणि त्याची बहीण शाळेत जात असे. त्यांचे हे सुखमय जगणं कोणाला तरी खटपट होते, या कुटुंबाला ते बघूनच होते...

               एक दिवस नूरप्याचे आईवडील व मोठा भाऊ नारू आपलं काम आपटून घरी येत होते तेवढ्यात त्याचे बाबा ओळखळत खाली पडले आणि पोट धरून जोर-जोरात ओरडू लागले आणि ओरडत-ओरडत कड मारलीय मला कड अस बोलत होते. (कड मारलीय म्हणजे मंतर मारलीय) नूरप्याची आई व भावाने त्यांना कसेबसे घरी नेले. त्यांना घरी नेऊन नारू नूरप्याला घेऊन बाहेर गेला. इकडे त्यांच्या बाबांचे शरीर कमजर होऊ लागले होते ते गयावया करत होते, पोट धरून ठेवण्याची ही त्यांच्यात शक्ती कमी होत होती. नूरप्याची आई व बहीण त्यांना अस बघून रडत होते, अचानक अस-कसे, काय करावं काय नाही... तेवढ्यात ते दोघे एका भगताला घेऊन आले त्यांनी त्याची नस तपासली, नस तपासतांना भगताला एक झटका बसला आणि दूर फेकले गेले. एवढं झाले तरी भगत उठला आणि त्याने ज्वारीचे काही दाणे मागितले आणि मंत्र जपत त्या ज्वारीच्या दाण्यांची एकेक जोडी करून बाजूला करत होते, काही वेळात त्याने असे काय पाहिलं की ते काही वेळ थक्क होऊन डोक्याला हात धरून बसले. नूरप्याच्या आईला जवळ बोलवलं आणि त्यांनी तिच्या कानात कोणालाही ऐकू येणार नाही एवढ्या हळू आवाजात बोलू लागले तुमच्या ह्या अख्ख्या कुटुंबावर मोठ्या भयाण डाकीणची काळी सावली पडलीय. ती एकेक करून सगळ्यांना खाऊन टाकेल सांगतेय व भगता तू ही माझ्या आणि या कुटुंबामध्ये येऊ नकोस नाहीतर यांच्या आधी तुला संपवेल. एवढं बोलून भगताने त्याच्या पिशवीतून एक पुडी काढून तिला दिली व तिथून निघून गेला.

               कोण होती ती जे या सुखाने जीवन जगत असणाऱ्या आणि कोणाचंही काही न बिगडवलेल्या, कुणाच्याही भानगडीत न पडणाऱ्या अख्खाच्या अख्खा कुटुंब उध्वस्त करू पाहणारी.

               रात्रीचे सव्वा एक वाजण्यात आले तरी कोणीच काही खाल्ले नव्हते ते फक्त त्यांच्या बाबा जवळ बसून त्यांना बघत बसले होते आणि विचार करत होते. काय झाले बाबांना,. कोणाची नजर लागली त्यांना. तितक्यात त्यांचे बाबा उठले आणि एक पाण्याच्या हंडा भरून होता त्यातील पाणी ते घोटा-घोट पित होते, पाणी पिता-पिता त्यांचे डोळे बाहेर निघू लागले आणि पोट जसे प्रेग्नेंट असणाऱ्या बाई सारखे फुगू लागले. बघता-बघता त्यांनी त्या हंड्यामधील सगळे पाणी पिऊन घेतले व काही वेळातच त्यांचं सगळं अंग थोड होत गेलं. नूरप्याच्या आई, भाऊ व बहीण व स्वतः नूरप्या मोठं-मोठ्याने रडू लागले, रडारड चालू झाली. सर्वांना कळून चुकलं त्यांचे बाबा या जगात राहिले नाही. पण सगळ्यांना एक प्रश्न पडला होता की त्यांनी एक हंडाभर पाणी पिल्ले होते, ते कुठे गेले आणि असे होणे शक्य होते का???

               नूरप्याच्या वडिलांच्या या अशा मृत्यूने गावकरी सगळे विचारात पडले काय चाललंय आपल्या या बंधारे गावात, कुणाची एवढी मोठी हिम्मत झालीय. या सुखात राहणाऱ्या कुटुंबाला कोणाची नजर लागली. गावात सगळी कडे ही खबर पोहचली. गावात अशी एक व्यक्ती जी तिच्या कानी ही खबर पडताच कावरी-बावरी होऊन लगेच घरात शिरली आणि घरात शिरताच आपल्यातील लागलेली आग विजल्यासारखी मोठं-मोठ्याने हसत होती. ती इतकी खुश झाली की तिला आता कोणीच थांबवू शकत नाही.

                घरात नूरप्याची आई आपल्या मोठ्या पोराला नारूला बोलत होते त्या भगताने जे सांगितले होते ते फार भयानक होते. त्यावर नारू बोलत होता असे काय पाप केलं आहे म्हणून देव आपली परीक्षा घेत आहे, नाहीना काय चूक झालीय आपल्याकडून. नारू त्या भगताकडे जातो अस बलून तो घरातून बाहेर पडला व काही वेळानंतर तो त्या भगताकडे पोहचला. हा येणार असल्याचे त्या भगताला पहिल्यापासून माहिती होते. भगताने त्याला घरात घेतलं आणि त्याला बोलू लागला तुम्हाला या संकटातून वाचायचे असेल तर तुम्हाला जसे मी सांगेल तसे न घाबरता न डगमगता करावे लागेल, काहीही झाले तरी घाबरायचे नाही व आपली जागा सोडायची नाही, तरच तुम्हाला या संकटेतून सुटका भेटेल. नारूने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी सगळी तयारी त्या भगताला दाखवली. त्यांचं ठरलं आणि भगताने त्याला सगळे काही सांगितले व साधनसामग्री तयार ठेवण्यास सांगितली.

               भगताने सांगितल्या प्रमाणे सगळी साधनसामग्री नारूने घेतली व तो आणि भगत ठीक १२ वाजता शमशानभूमीत गेले. त्या शमशानात इतके भयानक काळोख अंधार होते की ते पाहून कोणीही भयभीत होऊन जाईल असं .भगताने त्याला आधीच सांगितले होते काहीही झाले तरी घाबरायचे नाही व जागेवरून हालायचे नाही. भगताने त्याला सांगितले ज्या-ज्या वेळेस जे मी मागेल ते तू देत राहायचे, त्याने होकार दिला. भगत आणि नारू शमशानभूमीच्या मोधोमध जाताच भगताने आता त्याची विद्या सुरू केली त्याने एक एक वस्तू मागायची सुरुवात केली. पहिले त्याने शेंदूर व कोंबडीचे अंडे मागितले, भगताने त्या कोंबडीच्या अंड्याला शेंदूरने चार रेषा ओढल्या, नंतर त्याने सातरंगी दोरा मागितला व सातरंगी दोऱ्याने त्या अंड्याला बांधून लागला. जस तो त्या अंड्याला गाठ मरणाची वेळ येई तस तो एक मंत्र मारत; असे बरेच गाठ बांधून झाल्यावर भगताने नारूला ते कोंबडीचे अंडे दिले आणि बोलले हे अंडे तुझ्या उजव्या हातात ठेव व डाव्या हाताने खड्डा खोदून मी सांगेल तेव्हा तू या अंड्याला त्या खड्डयात पुरून द्यायचं. त्यांनतर नारू कडून अगरबत्ती व आगपेटी मागितली. नारूने भगताला अगरबत्तीचा खोका व आगपेटी काढून दिले. भगताने त्यातील ९ अगरबत्ती काढली व ती पेटवू लागला. अगरबत्ती पेटवताच त्या डाकीण ला ते तिकडे काय चाललंय त्याची भनक होताच ती विजेच्या वेगाने शमशानात असलेल्या काटेरी झाडावर येऊन बसली.

               ती येताच शमशानभूमी जागी झाल्यासारखे त्या दोघांना वाटू लागले. ती भयानक गाणे गाऊ लागली. मी खाऊ..... मी खाऊ..... मी खाऊ..... मी खाऊ..... तिचे गाणे इतके भयंकर की कोणीही तिथून उठून हजार पट वेगाने पडत सुटणार असं. इतके भयानक वातावरण त्या दोघांनी कधी पाहिले नव्हते, तरी त्यांना न थांबता विधीपूर्ण करायची होती. भगताने त्याला खड्डा खोदायला लावला आणि मंत्र म्हणू लागले. त्यावर ती डाकीण चिडली व भगताला हवेत उचलले भगताने खड्डा खोदणे थांबवलेल्या नारूला सांगितले तू भटकू नकोस तू आपले काम कर त्याला भान आली व तो पुन्हा खड्डा खोदू लागला. डाकीण हे पाहून जास्तच चिडली व भगताला हवेतच फिरवले व नारू समोर जोरात आपटले. नारू उठून उभा राहिला व आपल्या उजव्या हातात असलेल्या अंड्याकडे पाहू लागला, ते कोंबडीचे अंडे फुटून गेले होते... अंडे फुटून गेले म्हणजे त्याची विधी थांबली हे बघून ती डाकीण शांत झाली. आता कसे-बसे या दोघांना घरी पोहचायचे होते, घरी पोहचल्यावरच हे दोघे वाचणार होते.

               नारूने व भगताने दोघांनीही एकमेकांचे हात पोकडून घेतले व तिथून पडायला सुरुवात केली, जोपर्यंत दोघे एकमेकांचे हात पकडून होते तोवर ती त्या दोघांना कोणतीच इजा पोहचवू शकत नव्हती. तरीही ती मायावी डाकीण त्या दोघांना सोडायच्या बेतात नव्हती, ते दोघे जोरात धावत पळत होते आणि ही मायावी डाकीण आपला जोबडा दोघे म्हावून जातील एवढा जोबडा करून दोघांच्या पाठलाग करत होती, भगताने व नारूने हिम्मत सोडली नाही, भगत मंत्र म्हणत जात होता आणि ही त्यांच्या पासून लांब- लांब जात होती. दोघेही भागताच्या घरी पोहचले आणि दोघे तासभर जोरजोराने श्वसोश्वस घेत शुद्धधिवर आले, पण नारू ते भयानक दृश्य पाहून वेड्यासारखा होऊ लागला. काही दिवसाने तो खरच वेड्यासारखा वागू लागला.

वर्तमान:-

               ती अमावस्याची रात्र होती. अमावस्या म्हटलं की लोकं रात्र होण्याआधीच घरात राहायचे. त्या रात्री घराबाहेर पडणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण अशी समजूत आजही या जगात आहे. नूरप्या आपल्या घरी पूर्ण थकलेला व भयभीत अवस्थेत मुठीत जीव घेऊन चुली जवळ जाऊन बसला, नूरप्याला अशा अवस्थेत पाहून त्याची आई घाबरली व काय झालं पोरा काय झालं, निमू कुठे आहे. तिला एकटीला सोडून अर्धवट बलून ती हतबग झाली,... आणि इथं नदीकाठी काय होत होते कोणालाच ठाऊक नव्हते; नूरप्या तर कसा-बसा तिथून आपले प्राण वाचवून पडून गेला, पण त्याच्या बहिणीने भावाचा जीव वाचावा म्हणून तिथेच त्या मायावी डाकीण ला रोखण्याचे प्रयत्न करत असलेल्या निमुचे काय. तिला माहिती होते की आपण या मायावी डाकीणला रोकू तर नाही शकत पण दोघांपैकी एकाच्या तरी जीव वाचेल या विचाराने ती आपल्या भावाला तिथून पडून जाण्यास सांगत होती, पण नूरप्या तिला एकटीला सोडून जाण्यास तयार नव्हता. पण ती रात्र आज दोघांपैकी एकाचा जीव तर घेणारच होती. निमूने त्याला तिथून पडून जाण्यास भाग पाडले आणि नूरप्या सुरकन पडत सुटला.

               ती रात्र आणि निमू. नदीतील पाणी थांबले, तेथील झाडेझुडपे निराश हताश होऊन ते दृश्य पाहत होते. डाकीण निमुला एक धोबी जसे कपडे धुण्याच्या वेळेस त्यांना जोरात दगड्यावर अपटतो तसे ती डाकीण निमुला दगडावर आपटत होती, असे अपटणे तिला जणू हवेहवेसे वाटत होते. निमू रक्ताने पूर्णपणे माखली होती, तिला काहीच शुद्धी नव्हती, आणि त्या डाकीणचे ते भयाण गाणे सुरू झाले. मी खाऊ..... मि खाऊ..... मी खाऊ..... जस-जसे निमुचे शरीर घायाळ होत-होते तस-तसे त्या डाकीणचे गाणे स्वर बदलत होते... मी खाऊ..... मी खाऊ..... निमू मी तुला खाऊ....... मी खाऊ..... एवढं भयानक गाणे स्वप्नात पण कोणाला ऐकू येऊ यायला नकोत. तिचं निमुला अपटणे झायलवर निमुला ती घोडा बनवून तिच्यावर स्वार होऊन निमुला फिरवू लागली. इकडून तिकडे अस ती फिरवत होती, असे तिचे क्रम पहाटे ४ वाजेपर्यंत चालूच होते आणि थोड्या वेळात निमुला फिरवत फिरवत डाकीणने तिथूनच एका झाडावर फेकून दिले. नीचे मृत देह त्या झाडावरून सळसळ खाली कोसळले. आता ती डाकीण शांत झाली, अंगातील सगळे वस्त्र काढून फेकले व ती त्या नदीत उतरून अंघोळ करू लागली. अंघोळ झसल्यावर ती आपले वस्त्र अंगात न घालता हातात घेऊन घरी जाण्यास निघाली...

               पहाट होताच नूरप्या व नूरप्याची आई त्या नदीकाठी जाऊ लागले जाता-जाता त्यांना ती निर्वस्त्र स्त्री दिसली. तिला निर्वस्त्र पाहून त्यांना कळून चुकलं की ह्याच स्त्रीने आपल्या बाबाला व निमुला खाल्लं. हीच ती आपल्या सुखाच्या परिवाराला दुःखात टाकणारी...

               निमुला देवाघरी जाऊन बरेच दिवस झालं. इकडे नूरप्याची आई आपल्या सुखात नांदणाऱ्या परिवाराला फासणाऱ्या त्या डाकणीला तर मी सोडणार नाही, आज न उद्या तिचा विनाश मीच करणार हो मीच...! जणू नूरप्याच्या आईला डाकीणीला कसे संपवायचे, तिच्या विनाश कसा होईल हे माहीत असावं अशी ती बोलत होती. तो दिवस आला ती जी डाकीन असलेली स्त्री काही कारणास्तव बाहेर गावी गेली होती. त्या दिवशी नूरप्याची आई त्या स्त्रीच्या घरात गुपचूप लपून कोणालाही न समजू देता गेली. त्या घरात कोणीही नसल्याने घरात पूर्ण काळोख अंधार होता. अंधार असल्याने काहीही दिसत नव्हते, तरी नूरप्याची आई तिथे त्या घरात काय तरी शोधत होती, बराच वेळ झाला तरी तिला हवं ते मिळत नव्हते. तिने हार मानून माघारी जाणे म्हणजे सत्यावर असत्याचा विजय; आज काय पण होईल मी ते शोधूनच काढीन अस पुटपुटत ती पुन्हा शोधू लागली.

               जे हातात येईल त्यात बारकाईने लक्ष देऊ लागली. तिला खाली काही सापडले नाही, तेव्हा ती त्या घरात असलेल्या माळेवर गेली व तिची शोधाशोध पुन्हा सुरू झाली. माळेवर असलेल्या त्या धान्याच्या पेटित ती पाहू लागली आणि अचानक तिच्या हाती जे तिला हवे ते आले. ती एक पत्र्याची छोटीसी डबी होती. ती डबी घेऊन ती मागेवळून न बघता सरळ आपल्या घराच्या रास्ता धरला. आपल्या घरी आल्याच तिने चुलीत आग पेटवली व ती डबी उघळी, डबी उघळताच त्या डबीतून काय असं भयंकर निघत होते; ते अल्यु-लुल्यू करत बोलत होतं. मास दे शुशु (शुशु-रक्त) दे अल्यु-लुल्यू... मास दे शुशु दे अल्यु-ल्युलू... मास दे शुशु दे अल्यु-ल्युलू... नूरप्याच्या आईने त्याला आपल्यावर हावी न होऊ देता त्या पेटणाऱ्या आगीत फेकले, ते आगीत पडताच तरमडू लागले, भयंकर असा काळा धूर निघाला व त्या काळ्या शक्तीचे तिथेच विनाश झाले... पुन्हा सत्याने असत्यावर जीत मिळवली.

               डाकिणीचा जीव हा तिच्या शरीरात नसतो, तर तिच्या जीव हा कसल्या तरी पेटी किंवा डबीत असतो. आणि ती वस्तू कोठल्या तरी निर्जीव ठिकाणी लपवून ठेवलेला असतो हे नूरप्याच्या आईला माहीत होते. त्या डाकीणीच्या खात्मा झाला होता त्या स्त्रीच्या नव्हे, आता ती स्त्री साधारण झाली होती.






...समाप्त...



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग

माझी छम-छम